भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी, आई ठार; ६ गंभीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ एप्रिल २०२२

भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी, आई ठार; ६ गंभीर

चीचपल्ली जवळ पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा भीषण अपघात,दोघांचा जागीच मृत्यू तर 6 जण जखमी


चंद्रपूर - मूल मार्गावरील चीचपल्ली जवळ झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि आई ठार झाली. या अपघातात आणखी 6 जण गंभीर जखमी आहेत.

मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाचा कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी अनिल पारखी आपल्या कुटुंबियांसह चंद्रपूरला आपल्या घरी आले होते. चामोर्शी येथे परत जात असताना
चीचपल्ली जवळ मार्गात गुरे ढोरे आडवी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.  यात भरधाव वेगातील कार चारदा उलटली. 

यात पोलीस कर्मचारी अनिल पारखी यांची पत्नी 32 वर्षीय किरण पारखी, आई 65 वर्षीय शोभा पारखी यांचा जागीच मृत्यू झाला. 

पोलीस कर्मचारी अनिल पारखी 40, साधना पारखी 45, राम पारखी 7, आराध्या पारखी 4, ओम 10 व नंदिनी 14 वर्ष हे जखमी झाले आहे. जखमींचा उपचार चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात सुरू आहे.


Chandrapur Maharashtra India bhadrawati India bhadrawati ramtek mul Gadchiroli