खासदार बाळू धानोरकर यांच्या त्या कृत्यावर हंसराज अहिर म्हणाले ...... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० एप्रिल २०२२

खासदार बाळू धानोरकर यांच्या त्या कृत्यावर हंसराज अहिर म्हणाले ......

खासदारांनी पदाच्या अहंकाराऐवजी गरीमा जोपासावी - हंसराज अहीर
चंद्रपूर - चंदपूर जिल्ह्याच्या खासदारांनी भद्रावती येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाशी गैरवर्तणूक केल्याने पोलिसांनी त्यांचेवर गुन्ह्याची नोंद केल्याचे कळते. सदर प्रकार हा लोकशाही मुल्यांना पायदळी तुडविणारा आहे. एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधकडून हल्ला, शिविगाळ व धमकीसारखा प्रकार निषेधार्ह असून निंदास्पद आहे असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.


लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारच्या वर्तणूकीची अजिबात अपेक्षा नाही. पदाच्या अहंकाराऐवजी पदाची गरीमा जोपासावी तसेच सार्वजनिक कार्यातून हेे दाखविण्याऐवजी एका कनिष्ठ कर्मचाऱ्यास धमकी देण्यात स्वारस्यमानणाऱ्या वृत्तीचा सर्व स्तरीय निषेध होणे गरजेचे असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

22 मे 2022 ला विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक असल्याने सध्या सर्व कार्यभार निवडणूक अधिकारी सांभाळत आहे.

18 एप्रिल पासून नामनिर्देशन स्वीकारण्याचे काम सुरू झाले आहे, अश्यातच खासदार धानोरकर 19 एप्रिलला त्या सहकारी संस्थेत पोहचत व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांना सम्पर्क साधत सहकारी संस्थेत बोलाविले.

व्यवस्थापक गोविंद ठाकरे हे तात्काळ संस्थेत दाखल झाल्यावर खासदार धानोरकर यांनी निवडणूक संबंधित कागदपत्रांची मागणी केली, यावर ठाकरे यांनी असमर्थता दाखवीत नियमाप्रमाणे ते कागदपत्रे निवडणूक अधिकाऱ्याकडून घ्यावे लागेल असे सांगितले, मात्र खासदार धानोरकर ठाकरे यांचेवर संतापले व तू मला शिकवतो काय, कागदपत्रे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी ठाकरे यांना दिली.


इतकेच नव्हे तर खासदारांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याशी धक्काबुक्की केली, खासदार धानोरकर हे ठाकरे यांच्या अंगावर येत त्यांच्या अंगरक्षकाने मध्यस्ती केली. ठाकरे यांनी भद्रावती पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. भद्रावती पोलिसांनी खासदार धानोरकर यांचेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. 


Hansraj Ahir said on that act of MP Balu Dhanorkar .....Hansraj Ahir said on that act of MP Balu Dhanorkar .....