डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर स्वच्छ करून हिंदूराष्ट्रम ग्रुप व स्वराज्य फाउंडेशन चे महामानवास अभिवादन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ एप्रिल २०२२

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर स्वच्छ करून हिंदूराष्ट्रम ग्रुप व स्वराज्य फाउंडेशन चे महामानवास अभिवादन
चंद्रपूर :- आज हिंदुराष्ट्रम ग्रुप व स्वराज फाउंडेशन चंद्रपूर तर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, १४ एप्रिल महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त शहरातील लाखो बांधवांसह सर्व धार्मिय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात, महामानवाच्या पुतळ्याला हार, फुले, अगरबत्ती, मेणबत्ती लावून वंदन करतात त्यामुळे पुतळा परिसरात हार फुलांचा कचरा मोठया प्रमाणात साचला होता, करिता पुतळा परिसर स्वच्छ करण्यासाठी आज हिंदुराष्ट्रम ग्रुप व स्वराज फाउंडेशन चंद्रपूर तर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, पुतळ्याचे समोरील व मागच्या बाजूस जमा असलेला हार फुलांचा कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

हिंदुराष्ट्रम ग्रूप सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहून विविध महापुरुषांच्या पुतळ्याजवळील तसेच सार्वजनिक स्थळ परिसर स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवित असते.

यावेळी ग्रुपचे संयोजक देवानंद साखरकर, हिमांशू दहेकर, नरेंद्र लभाने, समीर लाभे, प्रियंका पुनवटकर, अक्षय सहदेव, चेतन पटेल, अमेय सकदेव, इत्यादींची उपस्थिती होती.Greetings of Hindu Rashtram Group and Swarajya Foundation by cleaning the premises of Dr. Babasaheb Ambedkar statue