तोहोगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या नागरिकांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ एप्रिल २०२२

तोहोगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या नागरिकांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली भेट

तोहोगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या नागरिकांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली भेट

जिल्ह्यातील तोहोगाव येथे #वाघाच्या_हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या शरद पोपनवर व सुरज मत्ते या दोघा इसमांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज 15 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

गोंडपिपरी तालुक्यात आठवडा पासून धुमाकूळ घालत असलेला वाघ गावालगतच्या झुडपात असल्याची माहिती कळताच नागरिक वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. चवताळलेल्या वाघाने जमावावर हल्ला चढविला. यात दोघे गंभीर जखमी झाले. वाघाच्या हल्ल्यात राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील सुरेश मत्ते व तोहोगाव येथील शरद बोपणवार हे दोघे नागरिक जखमी झाले आहेत. या दोघांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. यावेळी उपस्थित डॉक्टरांशी रुग्णांविषयी चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे सूचित केले.


Former Union Minister of State for Home Hansraj Ahir visited the people who were seriously injured in the tiger attack at Tohogaon.