मयुरेश शेटे उलगडणार आकाशातून पडलेल्या वस्तूचे रहस्य; कोण आहेत मयुरेश | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ एप्रिल २०२२

मयुरेश शेटे उलगडणार आकाशातून पडलेल्या वस्तूचे रहस्य; कोण आहेत मयुरेश |काही दिवसापूर्वी विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि आणखीन काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उल्कापात झाला असे अनेक गावकऱ्यांना वाटत होते. रात्रीच्या अंधारामध्ये अवकाशातून अनेक वस्तू चमकत येताना दिसत होत्या. बऱ्याच जणांना उल्कापात होतो आहे, असे वाटत होते. अनेक जिल्ह्यांमध्ये गावकरी घाबरले होते.
काही गावांमध्ये रात्रीच्या वेळेस खूप मोठा आवाज होऊन काहीतरी वस्तू आदळण्याचा आवाज येत होता. रात्री आणि सकाळी अनेक ठिकाणी गावकऱ्यांच्या लक्षात आले की अवकाशातून मोठी लोखंडी रिंग पडलेली आहे तर काही ठिकाणी बलून सदृश्य वस्तू दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. मयुरेश शेटे चंद्रपूरला हजर झाले आणि पडलेल्या वस्तूचा आढावा घेतला.

मयुरेश हे विद्या विकास मंदिरचे माजी विद्यार्थी. माजी प्राचार्य श्री. कैलास शेटे सर यांचे सुपुत्र. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने इस्रोशी आणि पोलीस अधिकाऱ्यांची संबंध साधून हे नेमके प्रकरण काय आहेत याचा तपास करावा अशी विनंती केली. त्यानुसार मयुरेश महाराष्ट्रात (विदर्भात) ज्या ज्या ठिकाणी या वस्तू पडलेल्या आहेत, त्या नेमके कशाच्या आहेत याचा रिपोर्ट ते देणार आहेत.

मयुरेश हे तिरुवनंतपुरम येथे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो येथे 2009 पासून अभियंता आहेत.

पडलेल्या वस्तू चिनी सॅटेलाईटच्या आहेत की आणखीन कसले आहेत याचा शोध घेण्याचे काम इस्रोने मयुरेश ला दिले, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला, दहावी बारावी अगदी डिग्रीलाही नंबर काढणाऱ्या मयुरेशने थोडासा अडवळणाचा, अवघड किचकट मार्ग स्वीकारला. आणि त्यात तो यशस्वीही झाला.

कोरोणा महामारीच्या कालावधीमध्ये जगात व भारतात औषधांचा तुटवडा जाणवला. व्हेंटिलेटरची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. याही वेळेस भारताला, जगात गौरवाचे स्थान मिळवून देणाऱ्या इस्रोने शास्त्रज्ञ (संशोधक) श्री.मयुर शेटे वर विश्वास ठेवला. खूपच कमी कालावधीमध्ये अतिशय स्वस्तातल्या व्हेंटिलेटरचे डिझाईन तयार करून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.


अवकाशातून पडलेले अवशेष याची तपासणी करण्याकरिता इस्त्रोची टीम चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली असून, आज सिंदेवाही येथे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या अवशेषांची त्यांनी तपासणी सुरू केली.

मागील आठवड्यात आकाशातून अवशेष पडत असल्याचे दृश्‍ उभ्या महाराष्ट्राने पाहिले. हे अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लगत पडले. प्रशासनाने हे अवशेष पोलीस स्टेशन मध्ये जमा करून या अवशेषांची तपासणी करण्याकरिता इस्रोला विस्तृत इमेल केला. इस्रोच्या पथक येऊन यावर्षीची याची तपासणी करतील असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार आज हे पथक येथे दाखल झाले असून याची तपासणी सुरू केली आहे.

· Engineer · ISRO
View mayuresh shete's

Mayuresh Kailas Shete -

— Engineer at Indian Space Research Organisation (ISRO)2009–present · Studied Masters in Mechanical Engineering at Indian Institute of Science,