चंद्रपुरातील सॅटॅलाइट तुकडे : इस्रोने केली फेसबुक पेजवरून एक महत्वपूर्ण पोस्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ एप्रिल २०२२

चंद्रपुरातील सॅटॅलाइट तुकडे : इस्रोने केली फेसबुक पेजवरून एक महत्वपूर्ण पोस्ट
काही दिवसापूर्वी विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि आणखीन काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उल्कापात झाला असे अनेक गावकऱ्यांना वाटत होते. रात्रीच्या अंधारामध्ये अवकाशातून अनेक वस्तू चमकत येताना दिसत होत्या. बऱ्याच जणांना उल्कापात होतो आहे, असे वाटत होते. अनेक जिल्ह्यांमध्ये गावकरी घाबरले होते.
काही गावांमध्ये रात्रीच्या वेळेस खूप मोठा आवाज होऊन काहीतरी वस्तू आदळण्याचा आवाज येत होता. रात्री आणि सकाळी अनेक ठिकाणी गावकऱ्यांच्या लक्षात आले की अवकाशातून मोठी लोखंडी रिंग पडलेली आहे तर काही ठिकाणी बलून सदृश्य वस्तू दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पडलेल्या वस्तूचा आढावा घेतला. दरम्यान इस्रो ने फेसबुक पेजवरून एक महत्वपूर्ण पोस्ट केेली. 


महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये 2 एप्रिल 2022 रोजी सायंकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या रहस्यमय चमकणाऱ्या प्रकाशावर अनेक स्त्रोतांकडून इनपुट प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूरचे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून औपचारिक संवाद प्राप्त झाला आहे. पवनपूर गावात मोकळ्या शेतात धातूची अंगठी आणि सिलिंडरसारखी वस्तू सापडल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार, इस्रोचे शास्त्रज्ञांचे पथक पाहणी आणि पुढील वैज्ञानिक चौकशीसाठी पवनपूरला येत आहे.


Inputs from several sources are received on the mysterious flashing light seen in the sky during the evening hours on April 2, 2022, in Maharashtra and Madhya Pradesh. Formal communication has been received from the office of the district magistrate and district collector of Chandrapur, Maharashtra. It is reported that a metal ring and a cylinder-like object or found in an open field in Pawanpur village. As requested by the district administration, a team of scientists from ISRO is visiting Pawanpur for inspection and further scientific inquiry.