डॉ. माधवी खोडे यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा पदभार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, एप्रिल २०, २०२२

डॉ. माधवी खोडे यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा पदभारनागपूर येथे नुकत्याच अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेल्या डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. आज या संदर्भात सायंकाळी शासन आदेश जाहिर झाला आहे. यापूर्वीच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे-वर्मा यांची सेवा केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे सह सचिव म्हणून झाल्यामुळे विभागीय आयुक्त पदाचा पदभार अमरावती विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडे सोपविण्यात आला होता. तथापि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. खोडे यांना या संदर्भात आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले.


Dr.  Madhavi Khode holds the post of Divisional Commissioner

Dr.  Madhavi Khode holds the post of Divisional Commissioner