मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात जयंती समारोह पार पडला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ एप्रिल २०२२

मुख्य मार्गावरील डॉ. आंबेडकर पुतळा चौकात जयंती समारोह पार पडलाचंद्रपूर : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या डॉक्टर आंबेडकर पुतळा चौकात समता सैनिक दल , भारतीय बौद्ध महासभा , रिपब्लिकन पक्ष , डॉ . बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती , चंद्रपूर द्वारा आयोजित डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा १३९ वा जयंती समारोह थाटात पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, ज्येष्ठ नेते बाळू खोबरागडे यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असणा-या आंबेडकर चाैकातील खुल्या पटांगणात जयंती समारोह घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.


विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती दिनानिमीत्‍त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण करून त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री हंसराज अहिर, महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, प्रकाश धारणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे, विशाल निंबाळकर, रवींद्र गुरनुले, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.