चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, एप्रिल १४, २०२२

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर राखी संजय कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर आणि आयुक्त यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी देखील पुष्प वाहून आदरांजली वाहिली.