चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी घेतली राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधींची भेट | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, एप्रिल ०६, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी घेतली राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधींची भेट |

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी घेतली राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधींची भेट


राज्यातील काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले असून, आज 6 एप्रिल रोजी राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुरा येथील आमदार सुभाष धोटे, विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांची उपस्थिती होती.

आमदारांच्या शिष्टमंडळाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही भेट घेतली. महाराष्ट्र राज्य विधानसभेतील काँग्रेसच्या अन्य सहकारी आमदारांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या भेटीप्रसंगी विविध मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, मागील आठ दिवसापूर्वीच या शिष्टमंडळाने पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. महाराष्ट्र राज्यातील राजकीय बदलासंदर्भात ही भेट होणार होती. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Congress MLAs from Chandrapur district met National Leader Sonia Gandhi