पोहायला गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, एप्रिल १०, २०२२

पोहायला गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
ब्रह्मपुरी : तालुक्यातील दुधवाही येथील रितेश विजय धोटे वय १२ हा मुलगा आपल्या मित्रांसोबत गावातीलच तलावावर पोहण्यासाठी गेला सर्व मित्र पाण्यात उतरले त्यातील दोन मुले खोल पाण्यात गेले.

काही मुलांनी समयसूचकता दाखवत गावात धाव घेऊन आपबिती सांगितली लगेच गावातील नागरिक तलावकडे धाव घेतली व पाण्यात बुडत असलेल्या बालकांना वाचविण्यासाठी पाण्यात गेले मात्र रितेश खोल पाण्यात गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्यास वाचविण्यात यश आले.

सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना दिली.पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून रितेश याचा मृतुदेह शवविच्छदनाकरीता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.