चंद्रपूर शहरातील ही झोपडपट्टी हटणार; मात्र..... | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०५ एप्रिल २०२२

चंद्रपूर शहरातील ही झोपडपट्टी हटणार; मात्र..... |सावरकर नगर येथील झोपडपट्ट्यांच्या हटवू नका; चंद्रपुरातील शिष्टमंडळाने केली रेल्वे विभागाच्या डिआरएम यांच्याशी नागपूर येथे चर्चा


सावरकर नगर आणि जलनगर येथील झोपडपट्ट्या हटवू नये या मागणी करिता आज ५ एप्रिल रोजी चंद्रपूरचे महापौर राहुल पावडे आणि भाजप पदाधिकारी तसेच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी नागपुर येथील डिआरएम रिचा खेरा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी सदर झोपडपट्ट्या हटवू नये अशी मागणी दोन्ही शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. 


सावरकर नगर आणि जलनगर येथे नागरिक मागील 25 वर्षापासुन वास्तव करत आहे. असे असले तरी सदर झोपडपट्टी हटविण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून हालचारी सुरु करण्यात आल्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये रोष आहे. ही बाब लक्षात घेता सदर झोपडपट्ट्या हटवू नये अशी मागणी करण्यात येत आहे.