१९ एप्रिलला होता विवाह; महिंद्रा होम फायनन्सच्या कार्यालयात रोखपालाची आत्महत्या | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ एप्रिल २०२२

१९ एप्रिलला होता विवाह; महिंद्रा होम फायनन्सच्या कार्यालयात रोखपालाची आत्महत्या |

१९ एप्रिलला होता विवाह;  महिंद्रा होम फायनन्सच्या कार्यालयात रोखपालाची आत्महत्या 
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील  मुख्य चौकात असलेल्या महिद्रा होम फायनन्स कंपनीत रोखपाल म्हणून कार्यरत असलेल्या 28 वर्षीय कपील वराते या तरूणाने कार्यालयातच गळफास घेत जिवनयात्रा संपविली. १९ एप्रिलला विवाह होणार होता. मात्र, त्याने त्यापूर्वीच जीवनयात्रा संपविली. 

चेकदरूर येथील कपील वराते हा गोंडपिपरी येथील महिद्रा होम फायनन्स या कंपनीत रोखपाल म्हणून कार्यरत होता. रविवारी कार्यालयाला सुट्टी असतांनाही कंपनीच्या कामानिमीत्त वराते त्याचे सहकारी व ग्राहक कार्यालयात पोहचले. चर्चा व इतर कामकाज पुर्ण झाल्यानंतर इतर सारे कार्यालयातून निघून गेले.वराते मात्र तिथेच होता. यानंतर त्याने कार्यालयातच गळफास घेत आपली जिवनयात्रा संपविली. घटनेची माहिती कळताच ठाणेदार जीवन राजगूरू,पिएसआय धर्मराज पटले घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहीती घेऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलीसांनी कार्यालयातील दस्तावेज व चाबी ताब्यात घेतली आहे.

#CHANDRAPUR #GONDPIMPARI #SUSUIDE