दारू दुकानाला विरोध करण्यासाठी घेणार जनमत चाचणी | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, एप्रिल २४, २०२२

दारू दुकानाला विरोध करण्यासाठी घेणार जनमत चाचणी |

दाताळा मार्गावरील दारू दुकानाला विरोध करण्यासाठी जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारूबंदी समिती घेणार जनमत चाचणीजगनाथबाबा नगरातील रामसेतूच्या पायथ्याशी मंजूर केलेले देशी दारू दुकान व बियर शॉपी रद्द करण्यासाठी  जगनाथबाबा  नगर दारूबंदी संयुक्त संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे .ही समिती आता या संदर्भात जनमत चाचणी घेणार असून, नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आज 24 एप्रिल रोजी रविवारी जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीने केले आहे.काही दिवसांपूर्वी जगन्नाथबाबा मठा जवळ रामसेतूच्या पायथ्याशी देशदारुची भट्टी व बियर शॉपिला परवानगी देण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करीत जनतेने  हा प्रयत्न हाणून पाडला आणि दुकान सुरू झालेच नाही. 18 एप्रिलला जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीच्या नेतृत्वात  जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांच्या संयुक्त हस्तक्षराचे निवेदन दिल्यावर 20 एप्रिलला जगनाथबाबा मठात  जगन्नाथ बाबा नगर दारूबंदी संघर्ष समिती गठीत करण्यात आली.

या समितीने एल्गार पुकारला असून आदोलनाचे विविध टप्पे ठरविले आहेत. यात पत्र भेजो व जनमत चाचणी, मोर्चा व निदर्शनेचा समावेश आहे. जनमत चाचणीला लवकरच सुरवात होत असून, यासाठी समितीच्या सदस्यांनी 'डोअर टू डोअर' सम्पर्क सुरू केला आहे.यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगन्नाथबाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीने केले आहे.

Chandrapur CMC Datala Road Jagannath baba Nagar