आकाशीय घटनेची चौकशी होणार; आणखी सापडले अवशेष - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ एप्रिल २०२२

आकाशीय घटनेची चौकशी होणार; आणखी सापडले अवशेष

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामधील नागरिक काल रात्री एक विशिष्ठ आकाशीय घटनेचे साक्षीदार झाले. आकाशातून जोरदार प्रकाशासह खाली जमिनीवर पडलेल्या विशिष्ट अवशेषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सुदैवाने यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.परंतु सतर्कता म्हणून त्वरित चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला याची दखल घेत सिंदेवाही भागातील घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहे. खगोलीय घटना व संबधित क्षेत्रातील विशेषज्ञ यांच्या टीम ला तत्काळ पाचारण करून तपास करण्यात येईल, अशी माहिती
पालकमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली.
काल सायंकाळी #सिंदेवाही परिसरात आकाशत अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. मिसाईल सारखी एक वस्तू पश्चिमेकडुन पुर्वीकडे गेली.त्यांनतर आकाशात थोड्या वेळाने बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला घटनास्थळी प्रशासनआल्याने सर्व अफवांवर ब्रेक लागलाआकाशातून भलीमोठी धातूची तप्त रिंग पडल्याचे स्पष्ट झाले