चंद्रपूर जिल्ह्यात गळा कापलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडला | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ एप्रिल २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात गळा कापलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडला |चंद्रपूर जिल्ह्यात गळा कापलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडला  |

भद्रावती-तेलवासा (BHADRAWATI- TELWASA) रस्त्यालगत असलेल्या सुमठाणा ( SUMTHANA)शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणीचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

हा मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत असून, CHANDRAPUR POLICE उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. या प्रकरणी श्वानपथकाची देखील मदत घेण्यात येत आहे. सुमठाणा तेलवासा रोड लगत असलेल्या एका लेआऊट च्या शेवटच्या मागच्या भागांमध्ये सदर तरुणीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसर सिल केलेला आहे आणि कारवाई सुरू केली आहे. माहिती येईपर्यंत मृतक तिचे नाव आणि ओळख पटलेली असून, पोलिसांनी घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास करीत आहे.


The body of the girl was found with her throat slit in Sumthana farm