नवेगावबांध येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रचंड उत्साहात साजरी. दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे, मन माझे गेले आनंदुन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, एप्रिल १६, २०२२

नवेगावबांध येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रचंड उत्साहात साजरी. दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे, मन माझे गेले आनंदुन

ढोल-ताशाच्या तालावर थिरकली, आंबेडकर अनुयायांची पाऊल.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६एप्रिल:-
येथील नगर बौद्ध समाजाच्या वतीने विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून,मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रशिक बुद्ध विहारात सकाळी ८.३० वाजता नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी पुष्पहार अर्पण केले. ठाणेदार जनार्दन हेगडकर, उपाध्यक्ष राजेंद्र साखरे,भास्कर बडोले,शितल राऊत,भिमाबाई शहारे,नगरबौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे, उपाध्यक्ष राजेंद्र साखरे, कोषाध्यक्ष देवदास बडोले,नगरबौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष भास्करजी बडोले,माजी अध्यक्ष विठोबा बडोले गुरूजी,माजी कोषाध्यक्ष हेमचंदजी लाडे,ग्रामपंचायत सदस्य शितलताई राऊत,सविता बडोले,समता सैनिक दलाच्या प्रमुख भिमाबाई शहारे,अर्चना टेंभुर्णे,बकुबाई शहारे,ग्रामसेवक नरेश बडोले, प्रा.दिनेश जांभूळकर,थानेराव वैद्य, हितेंद्र डोंगरे, अश्विन लांजेवार उपस्थित होते.गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कोषाध्यक्ष देवदास बडोले यांनी केले. 
पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथे सकाळी ९.३० वाजता रवी दहिवले यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ठाणेदार जनार्दन हेगडकर ,हरिचंद डोंगरे ,यशवंत बोरकर ,मंगल डोंगरे, यशवंत शेंडे, सुगंधा राऊत, माधुरी उके, जेतवन बुद्ध भूमी प्रकल्प येथे  ठाणेराव वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आसाराम टेंभुर्णे ,रमेश राऊत, हर्षल साखरे उपस्थित होते.सकाळी १२.३० वाजता मोटार सायकल रॅली काढण्यात आली. सम्यक ग्रुप नवेगावबांध च्या वतीने येथील बसस्थानकावर बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी व स्थानिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सम्यक ग्रुपचे अमोल टेंभुर्णे, अश्विन लांजेवार,मुख्याध्यापक सूर्यभान टेंभूर्णे, नवीन राऊत भीमराव मोटघरे,बादल शहारे,नवीन उके यांनी यावेळी सेवा दिली.दुपारी ४.३० वाजता भव्य शोभायात्रेला प्रशिक बुद्ध विहार येथून प्रारंभ झाला. शोभायात्रेत आबालवृद्धांसह युवक,महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  जयभिम- जयभीम,काय पाहता रागाने,संविधान लिहिले वाघाने, जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, एक्कच साहेब बाबासाहेब, बाबा तेरे नाम से जीते हैं शान से आदी घोषणांनी गाव दणाणून गेले. शोभायात्रा गावातील मुख्य मार्गावरून, बसस्थानक, पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथून प्रशिक बुद्धविहारात शोभायात्रेचा रात्री १०.०० वाजता समारोप झाला. ढोल-ताशांच्या तालावर युवक मंडळी, महिला, अबालवृद्ध  महिला,पुरुषांची पाऊले थिरकली होती. Covid-19 कोरोनाव्हायरस च्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षापासून आंबेडकरी बांधवांना जल्लोषात आंबेडकर जयंती साजरी करता आली नाही.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आंबेडकर जयंतीचा आनंद आंबेडकरी बांधवांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता.मन माझं गेले आनंदून,भीम ह्यात पाहून असाच सुखद अनुभव आंबेडकरी अनुयायांनी यावेळी घेतला. त्यामुळे जयंती उत्सवात मोठ्या संख्येने आंबेडकरी आबालवृद्ध, युवक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच जेतवन बुद्ध भुमी प्रकल्प, प्रशिक व पंचशील बुद्ध विहारात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. जयंती उत्सवाचा कार्यक्रम आंबेडकरी अनुयायांनी मोठ्यात संयमाने व शांततेने पार पाडला. नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी,चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश शहारे,संघर्ष टेंभुर्णे,प्रशिक शहारे, सरगम शहारे यांच्यासह नगर बौद्ध समाजाचे,जेतवन बुद्ध भूमी ग्रुप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.