हरिश्चंद्र लाडे याना राज्यस्तरीय डॉ.आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार जाहीर. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ एप्रिल २०२२

हरिश्चंद्र लाडे याना राज्यस्तरीय डॉ.आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार जाहीर.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.८ एप्रिल:-
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील साहित्यिक व प्रबोधनकार हरिश्चंद्र लाडे यांना अमरावती येथील डॉ. आंबेडकर एकता रॅली समिती च्या वतीने राज्यस्तरीय डॉ.आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे.
 येत्या १४ एप्रिलला अमरावती येथे हा अतिशय सन्मानाचा साहित्य पुरस्कार नामवंत व्यक्तीच्या हस्ते हरिश्चंद्र लाडे याना प्रदान केला जाणार आहे.
 लाडे यांचे १९८८ पासून विविध  वृत्तपत्रातून  व नियतकालिकामधून आंबेडकरी साहित्य प्रकाशित झाले आहेत.त्यांची एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.कवी म्हणून जगातील सर्वात मोठया आंबेडकरी काव्यसंग्रहामध्ये सुद्धा त्यांची कविता समाविष्ट आहे. समतेचे महाकाव्य या आंबेडकरी कविता संग्रहात पहिल्याच खंडात त्यांची आंबेडकरी कविता प्रकाशित झालेली आहे.
 मुंबई विद्यापीठाच्या मराठी आंबेडकरी समीक्षा ग्रंथात त्यांची समीक्षा समाविष्ट आहे.लाडे यांनी काही व्यक्तींच्या जीवन गौरव ग्रंथात चरित्र लेखन व  संपादन केले आहे.
 लाडे हे सुप्रसिद्ध वक्ता ,गायक,कवी, विद्यार्थीप्रिय  शिक्षक ,ग्रंथपिपासू  व झपाटलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत.फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या प्रचारात त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे.
हरिश्चंद्र लाडे यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच थरातून अभिनंदन होत आहे .