इयत्ता १ ली मधील नवागतांच्या स्वागत.पंचशील प्राथमिक शाळेत इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांना निरोप. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, एप्रिल २०, २०२२

इयत्ता १ ली मधील नवागतांच्या स्वागत.पंचशील प्राथमिक शाळेत इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांना निरोप.संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२० एप्रिल:-
पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांना निरोप आणि इयत्ता १ ली मधील नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमास इयत्ता ४ थी आणि इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीलजी कापगते शा.व्य.स.उपाध्यक्ष हे होते तसेच मंचावर दुर्गेशजी कुडेगावे, विनोदजी शहारे, मोटघरे सर भागडी, तुळशीरामजी बागडे, भालचंद्र चुटे मुख्याध्यापक, प्रियंका परशुरामकर, आशा परशुरामकर, किशोरजी शहारे, अनुराधा रंगारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त करतांना आम्ही पंचशील प्राथमिक शाळेला विसरू शकणार नाही आमची शाळा सदैव आमच्या स्मरणात राहील असे मत व्यक्त केले. इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेतलेल्या पालकांनी पंचशील प्राथमिक शाळेत आपल्या पाल्यास दाखल का बरं केलं याविषयी आपले मत मांडले. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सहायक शिक्षक खुशाल डोंगरवार यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना कंपास, होय मी वाचनारच हे पुस्तक आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. तसेच इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपली कृतघ्नता म्हणून एक दिवाल घडी भेट दिली.सदर कार्यक्रमाप्रसंगी खुशाल डोंगरवार यांनी  पालक या नात्याने आपली जबाबदारी कोणती आहे आणि ती जबाबदारी पार पडतांना आपल्याला आपल्या पाल्याना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे याविषयी  पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कापगते यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यासाठी शाळेला सदैव सहकार्य करण्याची ग्वाही संपूर्ण पालकांच्या वतीने दिली. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना गोड जेवण दिले गेले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.