चंद्रपुरातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० एप्रिल २०२२

चंद्रपुरातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली

चंद्रपूर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांची बदली झाली असून, त्यांची नियुक्ती जालना पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी हे चंद्रपूर येथे येण्यापूर्वी गोंदिया येथे कार्यरत होते.  2015 च्या बॅचचे अधिकारी असलेले अतुल कुलकर्णी हे 2016 मध्ये सोलापूर येथे नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी 2017 ते 2019 या काळात भायंदर येथे कार्यरत होते. 2019 जुलै मध्ये यांची गोंदिया येथे बदली झाली आणि त्यानंतर मागील दीड वर्षांपासून ती चंद्रपूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आज वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी त्यांची जालना पोलीस अधीक्षक म्हणून बदली झालेली.
Atul Kulkarni superintendent of police

Police officer Gondia Chandrapur Solapur Mira Bhayandar Thane Maharashtra police IPS