नवेगावबांध येथील युवकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना केले अभिनव अभिवादन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ एप्रिल २०२२

नवेगावबांध येथील युवकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना केले अभिनव अभिवादन.


समाजाच्या साठी तुझे रक्त वाहू दे ही संकल्पना.संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.१३ एप्रिल:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रामपंचायत भवनात आज १३ एप्रिल रोज बुधवारला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.60 रक्तदात्यांनी शिबिरात रक्त दान केले.समाजाच्या साठी तुझे रक्त वाहू दे, अन् मले तुझ्या रक्ता मधला भिम पाहू दे. या संकल्पनेतुन नवेगावबांध येथील नगर बौद्ध समाज व जेतवन बौद्ध भूमी ग्रुप यांच्या विद्यमाने, समर्पण रक्तपेढी भंडारा च्या सौजन्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दि.१३ एप्रिल रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता ग्रामंपचायत भवन नवेगावबांध येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक युवकांनी विश्वभुषण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे निमित्त साधून अभिनव पद्धतीने त्यांना अभिवादन केले .रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे, उपाध्यक्ष राजेंद्र साखरे संजय गाढवे,ललीचंद साखरे, शिबिराचे आयोजक प्रशिक शहारे, भूषण टेंभूर्णे,अंकित शहारे
यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या रक्तदान शिबिरात एकूण 60 रक्त दात्यांनी रक्तदान केले.
रक्तदात्याला टि.शर्ट व प्रमाणापत्र देण्यात आले.समाजात रक्तदानाचे महत्त्व रूजवणे, तरूण पिढीमध्ये रक्तदानाबददल जागृती निर्माण करणे,निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करीत नाहीत.त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करणे.हा या रक्तदान शिबिराचा हेतू होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधून, स्थानिक युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. या रक्तदान शिबिराला समर्पण रक्तपेढी भंडाराचे डॉ.श्री नखाते, डॉ.अभिषेक गिरेपुंजे, प्रणय शामकुवर ,अभीशेष कोल्हे, यांनी विशेष सहकार्य केले.
दिनेश शहारे, विपीन साखरे, रितिक सांगोळकर,मिथुन साखरे, प्रज्वल शहारे,लेनिन राऊत,सहायक अभियंता अक्षय वरटवार,दिलीप टेटे, प्रणय निमजे,प्रदीप राऊत,अनिल बडोले, सम्राट राऊत,निखिल शहारे, शुभम झुंझुरकर, सागर राऊत, प्रणय टेंभुर्णे नगर बौद्ध समाजाचे पदाधिकारी,जेतवन बुद्धभूमी ग्रुप चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.