धाबेटकडी पवनी येथील गोपाल आदमने बेपत्ता. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१२ एप्रिल २०२२

धाबेटकडी पवनी येथील गोपाल आदमने बेपत्ता.

विषारी औषध केले होते प्राशन.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१२ एप्रिल:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीमोर तालुक्यातील, धाबेटेकडी पवनी येथील गोपाल लक्ष्मण आदमने हे काल दि. 11 एप्रिल रोज सोमवारच्या सायंकाळ पासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने बेपत्ता झाले आहेत.त्यांनी विषारी औषध देखील प्राशन केले होते .त्यामुळे त्यांना उलट्या ही झाल्या होत्या . त्यामुळे त्यांनी शर्ट काढून फेकून दिली .ते बन्यानी वर आहेत .पोलिसांनी तपास केल्यानुसार ते नवेगावबांध च्या रोड वरून कोणाच्या तरी गाडीत बसून निघून गेले आहेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.तरी यांच्याविषयी ज्या कोणाला माहिती मिळेल त्यांनी पुढीक मोबाईल नंबरवर कळविण्याचे आवाहन नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर व आदमने कुटुंबियांनी केले आहे. म .पा .कोपुलवार 9403058630, नरेश आदमने 7709431358,राहुल आदमने 9146713003, ठाणेदार हेगडकर 9423565515 या संपर्क भ्रमणध्वनी वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.