सावरटोला येथे आरोग्य शिबीराचे आयोजन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०५ एप्रिल २०२२

सावरटोला येथे आरोग्य शिबीराचे आयोजन.

आरोग्यवर्धिनी केंद्र पवनी धाबेच्या वैद्यकीय चमूने दिली सेवा.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.५ एप्रिल:-
ग्रामपंचायत सावरटोला च्यावतीने आज ५ एप्रिल रोज मंगळवारला ११.३० वाजता आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले. आरोग्यवर्धिनी केंद्र पवनीधाबे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चमूने रुग्णांची तपासणी व उपचार केला. शिबिरात औषधीचे मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे हे होते. उपसरपंच सुवर्णा तरोणे, ग्रामसेवक एस. के.चिमणकर, संजीव बडोले, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र गजबे,डॅनी डोये, कविता चचाने उर्मिला शिवणकर, देवराम शिवणकर पांडुरंग भोपे, मंगलस्वरूप भेंडारकर, वासनिक गुरुजी पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी शिबिराचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब,शुगर, कुष्ठरोग, क्षयरोग,रक्ताच्या चाचण्या, सिकल सेल याविषयी तपासण्या करण्यात आल्यात.
सरपंच युवराज तरोणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मेंढे यांनी स्वतःच्या आरोग्या बरोबरच गावाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले.
आरोग्यवर्धिनी केंद्र पवनीधाबे चे डॉ. प्रविण दखणे,डॉ. भूषण मेंढे, सामुदायिक आरोग्य अधिकारी साहिल शेख,भारती पटले, आरोग्य सहाय्यक डावरे, वाय. एस. उंदीरवाडे, आरोग्य सेविका डि.के. उंदीरवाडे, शुभांगी मोहनकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आम्रपाली घरडे यांनी आरोग्य शिबिरामध्ये सेवा दिली.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्त्या निशा शिवणकर, सीमा मेश्राम,अंगणवाडी सेविका पंचफुला बांबोडे, शशिकला तरोणे, उषा फुंडे, मदतनीस दुर्गा भेंडारकर यांनी सहकार्य केले.