०६ एप्रिल २०२२
Home
गोंदिया.
ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा.नवेगावबांध ग्रामपंचायत ने केला होता पाठपुरावा.
ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा.नवेगावबांध ग्रामपंचायत ने केला होता पाठपुरावा.
उद्यापासून रुग्णांच्या सेवेत.
नवेगावबांध दि.6 एप्रिल:-
येथील ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा परिसरातील रुग्णांना मिळणार आहे. परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे खुप दिवसांपासुन डिजिटल एक्सरे मशिनची मागणी ग्रामपंचायत ने लावून धरली होती. गेल्या काही महिन्यांपासून या मशीन साठी आरोग्य विभागाकडे ग्रामपंचायत मे पाठपुरावा केला होता. आज दिनांक ६ एप्रिल ला ही मशीन ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे या आदिवासी, ग्रामीण,दुर्गम परिसरातील रुग्णांना या मशीनचा लाभ होणार आहे.
ही डिजिटल एक्स-रे मशीन पोर्टेबल असल्यामुळे,बेड साइडवर वापरण्यास सोपे आहे. कुठेही हलविता येत असल्यामुळे, रुग्णांची फारच सोय होणार आहे. उद्यापासूनच ही डिजिटल एक्स-रे मशीन रुग्णांच्या सेवेत येणार आहे.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र टंडन यांनी सांगितले.
ग्रामपंचायत ने गेल्या काही महिन्यापासून हे डिजिटल एक्स-रे मशीन ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला आज ही मशीन रुग्णालयाला प्राप्त झाली त्यामुळे परिसर रुग्णांना याचा नक्कीच लाभ होईल. नाहीतर नुसते एक्स-रे साठी साकोली, गोंदिया, वडसा या ठिकाणी खाजगी रुग्णालयात परिसरातील रुग्णांना जावे लागत होते. यात आता रुग्णांचा पैसा व वेळ वाचेल. त्यामुळे परिसरातील रुग्णांची खासच सोय झाली आहे.परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
- सरपंच अनिरुद्ध शहारे,
ग्रामपंचायत नवेगावबांध.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
