१२ एप्रिल २०२२
आंबेडकर जयंतीनिमित्त नवेगावबांध येथे १३ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
समाजाच्या साठी तुझे रक्त वाहू दे ही संकल्पना.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.११ एप्रिल:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रामपंचायत भवनात १३ एप्रिल रोज बुधवारला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मित्रपरिवार नवेगावबांध च्या वतीने हे आयोजन करण्यात आले. समाजाच्या साठी तुझे रक्त वाहू दे, अन् मले तुझ्या रक्ता मधला भिम पाहू दे. या संकल्पनेतुन नवेगावबांध येथील नगर बौद्ध समाज व जेतवन बौद्ध भूमी ग्रुप यांच्या सौजन्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दि.१३ एप्रिल रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता ग्रामंपचायत भवन नवेगावबांध येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदात्याला टि.शर्ट , प्रमाणापत्र देण्यात येईल.समाजात रक्तदानाचे महत्त्व रूजवणे, तरूण पिढीमध्ये रक्तदानाबददल जागृती निर्माण करणे,निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करीत नाहीत.त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करणे.हा या रक्तदान शिबिराचा हेतू आहे. इच्छुक रक्तदात्यांना आपली नावे रक्तदान शिबिराचे आयोजक -प्रशिक शाहारे मोबाईल क्रमांक ९५१८३१९०५०, भूषण टेंभूणे मोबा.८३२९८०९९३५, अंकित शाहारे मो.९५४५७३८५५५० नोंदवावी.असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
