नवेगावबांध येथे सुरक्षा रक्षक भरती मेळावा संपन्न. गोंदिया पोलीस दलाचे आयोजन,५६युवकांची निवड. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ एप्रिल २०२२

नवेगावबांध येथे सुरक्षा रक्षक भरती मेळावा संपन्न. गोंदिया पोलीस दलाचे आयोजन,५६युवकांची निवड.

मेळाव्यात परिसरातील २४८ युवकांचा सहभाग
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. १ एप्रिल:-
गोंदिया पोलीस दलाच्या वतीने नक्षल ग्रस्त भागातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ३१ मार्च रोज गुरुवारला पोलीस ठाणे नवेगावबांध येथे कमांडेट कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा जशपूर यांच्या वतीने दहावी,बारावी पास युवकांसाठी, सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात परिसरातील २४८ युवकांनी  सहभाग घेतला. या भरती मेळाव्याला उपस्थित युवकांना पोलीस ठाणे नवेगावबांधचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन हेगडकर, सिक्युरिटी अधिकारी डी. एन. सिन्हा, पोलीस हवालदार तुलावी, प्रपोगंडा सेलची पोलीस हवालदार मार्टिन यांनी मार्गदर्शन केले. 
सदर भरती मेळाव्यात उपस्थित २४८ युवकांपैकी ८० युवक शारीरिक मोजमाप पात्रते मध्ये पात्र ठरले. त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५६ युवकांची निवड करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देखील यावेळी देण्यात आले. निवड झालेल्या युवकांना पुढील प्रशिक्षणाकरिता कमांडेट कार्यालय क्षेत्रिय प्रशिक्षण केंद्र आरा जशपुर येथे प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी ठाणेदार हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार तुलावी, पोलीस हवालदार कोडापे, पोलीस शिपाई वाघाये, सैनिक, नक्षल सेलचे पोलीस हवालदार मार्टिन, मुस्ताक सय्यद, वंजारी, भोयर, घरत, पोलीस नायक राऊत, ताराम यांनी सहकार्य केले. १ एप्रिल ला केशोरी,२ एप्रिल ला डुग्गीपार येथे ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचा लाभ  युवकांनी घ्यावा. असे आवाहन गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.