कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात जटपूरा गेटसमोर भाजपच्या कार्यकत्यांनी केले कंदील आंदोलन | BJP Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२२

कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात जटपूरा गेटसमोर भाजपच्या कार्यकत्यांनी केले कंदील आंदोलन | BJP Chandrapur
वीज टंचाईच्या विरोधात आज रविवारी २४ एप्रिल रोजी रात्री भारतीय जनता पार्टी चंद्रपूरतर्फे जिल्हाभर कंदिल आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर येथे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या उपस्थितीत जटपुरा गेटसमोर  भाजपा कार्यकत्यांनी राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ कंदील घेऊन उभे होते. 


सध्याच्या वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याची मागणी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केली. 
वीज टंचाईच्या विरोधात रविवारी २४ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूरतर्फे कंदिल आंदोलन करीत निषेध केला. यावेळी भाजपचे नेते ब्रिजभूषण पाझारे, महानगरपालिकेच्या नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.