सुरुची आणि सोनालीचा मोहघाट जंगल परिसरात मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०५ एप्रिल २०२२

सुरुची आणि सोनालीचा मोहघाट जंगल परिसरात मृत्यू
भंडारा (Bhandara) : जिल्ह्याच्या साकोली (Sakoli) तालुक्यातील मोहघाट जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटी वरुन जाणाऱ्या वहिनी-नणदचा मृत्यु झाला.

सुरुची रवींद्र मल्लेवार (वय 36 वर्षे) मृतक वहिनीचे नाव असून, सोनाली आंगीडवार (वय 28 वर्षे) ही नणंद आहे.


सुरुची (suruchi) आणि सोनाली (Sonali) या दोघी आपल्या स्कूटी ने घुटसावरी वरून साकोली कडे येताना अज्ञात वाहनानी धडक दिली. यात सुरूची मल्लेवार या मुलीचा पूर्णपणे खांदा तुटला आणि दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला तर सोनाली संगीडवार यांच्या दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला.

त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले होते. अतिशय गंभीर असल्यामुळे सुुरुचीचा
सामान्य रुग्णालयात उपचारा करिता पाठविन्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान सुरुचि मलेवार यांच्या भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यु झाला.
सोनाली आंगीडवार यांच्या साकोली येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

सुरुची मल्लेवार याच्या आई गोंडउमरी पीएससी येथे आई नर्स असल्यामुळे त्यांना भेटायला दोोघीजण जाात होते मात्र मोहघाटा जंगलामध्ये झाडांची दोन्ही बाजूला कटाई सुरू आसल्याने रस्ता अरुंद झाल्याने भरधाव अज्ञात वाहनाने धड़क दिल्याने त्यांच्या मृत्यु झाला आहे. साकोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.