अलदरे शाळेत शाळापूर्व तयारी अभिमान मेळावा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, एप्रिल १६, २०२२

अलदरे शाळेत शाळापूर्व तयारी अभिमान मेळावा
जुन्नर :आनंद कांबळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलदरे येथे शाळानिहाय शाळापूर्व तयारी २०२२ ते २०२३ अभिमान मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बालवाडीतून इयत्ता 1 येणाऱ्या बालकांचा फेटा, फुगे, गुलाबाची फुले देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिपक सरजिने, मुख्याध्यापक उत्तम आरोटे, पांडुरंग भांगे, कुंदा मोधे, माडू दप्तरे, शैलेश सरजिने, शिक्षक वर्ग, पालक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

2020 पासून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा व अंगणवाड्या बंद होत्या. त्यामुळे बालकांना शिक्षणाना पासून दूर रहावे लागले आहे. इयत्ता 1 ली किंवा मोठ्या वर्गाच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू अंगणवाडीत जाणाऱ्या वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने शक्य झाले नाही. ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना शिक्षण दिले आहे आशा पाहिलेल्या प्रवेशपात्र बालकांची शाळा पूर्व तयारी चांगली झाली असेल त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येईल. 

परंतु ज्या बालकांची शाळा पूर्व तयारी झाली असेल अशा बालकांची व्यवस्थितपणे शाळा पूर्व तयारी होणे आवश्यक आहे. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील याचा गांभीर्याने विचार करून शाळा पूर्व अभियान पूर्ण ग्रामीण भागातील शाळेमध्ये २०२२ ते २०२३ ला राबवण्यात येत आहे.


Aldare school pre-school preparation meet