4 मे रोजी ठरणार मनपा निवडणुकीची तारीख | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, एप्रिल २८, २०२२

4 मे रोजी ठरणार मनपा निवडणुकीची तारीख |

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जून आणि जुलै मध्ये घेण्यास संदर्भातील एक अहवाल निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला. मात्र या कालावधीत पावसाळा असल्याने निवडणुका आशक्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या संदर्भातील पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार असून, त्यातच महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख ठरण्याची शक्यता आहे.

तत्काळ प्रक्रिया सुरू केल्यास मनपा निवडणुका १७ जून, नगर पालिका निवडणुका २२ जून, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ११ जुलै, आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका २ जुलै रोजी घेणे शक्य असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. आयोगाने थेट वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने आता लवकरच निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. मात्र, हा निर्णय 4 मे रोजी होईल.