29 एप्रिल रोजी संपणार महापौरांचा कार्यकाळ; मनपात प्रशासक बसणार | CMC Mayor Chandrapur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, एप्रिल २४, २०२२

29 एप्रिल रोजी संपणार महापौरांचा कार्यकाळ; मनपात प्रशासक बसणार | CMC Mayor Chandrapur

चंद्रपूर | शहर महानगरपालिकेचा (Chandrapur CMC) पंचवार्षिक कार्यकाळ २९ एप्रिल रोजी पूर्ण होत असून, त्याचदिवशी महापौरांचा (Mayor) देखील कार्यकाळ संपत आहे. ३० एप्रिलपासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार प्रशासकाच्या हाती देण्यात येणार आहे. 
२५ ऑक्टोबर २०११ मध्ये नगरपालिका (Muncipal Corporaction) बरखास्त करून महानगरपालिका स्थापन झाली. त्यानंतर पंच वार्षिक सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. 
Chandrapur mahanagar palika result
 त्यांनतर प्रथम महापौर म्हणून ३० एप्रिल २०१२ रोजी संगीता अमृतकर (Sangita Amrutkar) यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर अडीच वर्षांनी राखी कंचर्लावार (Rakhi Kancharlawar) महापौर बनल्या. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये पंचवार्षिक निवडुका झाल्या.  ३० एप्रिल २०१७ रोजी अंजली घोटेकर (Anjli Ghotekar) यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारली.

 सध्या मागील अडीच वर्षांपासून राखी कंचर्लावार ( Rakhi kancharlawar) महापौर असून, त्यांचा कार्यकाळ २९ एप्रिल २०२२ रोजी संपत आहे. दरम्यान, ओबीसी (OBC) आरक्षणामुळे 
Chandrapur Municipal Corporation Election
निवडणूक लांबणीवर गेल्या असून, पुढील आदेशापर्यंत मनपाचा कार्यभार प्रशासकाच्या हाती राहील.  

-----------------
Dont Copy
सदर कॉपी करू नये - कृपया शेअर करावी.