अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना 100% पाणी मापक मीटर बसवा. -किशोर तरोणे यांची मागणी. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, एप्रिल ३०, २०२२

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना 100% पाणी मापक मीटर बसवा. -किशोर तरोणे यांची मागणी.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० एप्रिल:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू असून, सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मार्फत तालुक्यातील साठ गावांना नियमित स्वच्छ पाणी पुरविला जातो.परंतु लोकांचा अति पाण्याचा गैरवापर होत असल्यामुळे, पाणी उपलब्ध असून सुद्धा काही भागांमध्ये नळांना पाणी उपलब्ध होत नाही,त्यामुळे गावांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होते.  राष्ट्रीय जल जीवन मिशन योजने अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत समाविष्ट गावातील सर्व नळांना पाणी मापक यंत्र मीटर लावण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी पालकमंत्री गोंदिया जिल्हा प्राजक्त तनपुरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
सर्वांना सारखं व मुबलक पिण्याचे पाणी मिळेल व पाण्याचा गैरवापरावर आळा बसेल. असेही किशोर तरोणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 100% मीटर लावण्याची मागणी
किशोर तरोणे यांनी आपल्या पत्रात केली आहे.यावेळी प्रामुख्याने आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,आमदार विनोद अग्रवाल, लोकपाल गहाणे, यशवंत गणवीर निप्पल बरैया,किशोर ब्राह्मणकर परशुरामकर उपस्थित होते.