१७ मार्च २०२२
Home
चंद्रपूर
उन्हाची तीव्रता वाढली; वाटसरुच्या तृष्णातृप्तीसाठी झोन सभापती छबुताई वैरागडे यांच्या सौजन्याने पाणपोई
उन्हाची तीव्रता वाढली; वाटसरुच्या तृष्णातृप्तीसाठी झोन सभापती छबुताई वैरागडे यांच्या सौजन्याने पाणपोई
चंद्रपूर | उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता वाटसरुंची तृष्णातृप्ती करण्याच्या दृष्टीने जटपुरा प्रभाग 7 मध्ये दि. 16/3/2022 ला ऑटोचालक मालक, पुरुष बचतगट पाण्याची टाकी ऑटोस्टॅड चंद्रपूर येथे झोन सभापती सौ छबुताई मनोज वैरागडे (Zone Chairman Chhabutai Vairagade) यांच्या सौजन्याने पाणपोई लावण्यात आली. आटो स्टँड चे अध्यक्ष सुजोत भासरकर यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा देवून पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, बाहेर फिरणाऱ्या आणि एसटीने ये-जा करणार्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष सुजोत भासरकर, उपाध्यक्ष जमीर बाबू खान, सचिव प्रकाश भैसार, प्रयास पाथाडे, विलास गाऊत्रे, मनोज जीडेवार, बाबाराव राजनकर, राजेंद्र हजारे, नशीय मामु, विशाल राऊत, बबन कांबळे, शामराव दानव, विलास पोटदुखे, प्रशांत वानखेडे, बाळूभाऊ पेटकुले, भीमराव घडसे, विनोद देठे, गौतम रामटेके, गणेश खनके राजुभाऊ मोहूर्ल यांची उपस्थिती होती.
The intensity of the sun increased; Panapoi courtesy of Zone Chairman Chhabutai Vairagade
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
