चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ मार्च २०२२

चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार?

कोरोनाची तिसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. विशेषत: मागील काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसावी यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.राज्यात लागू असलेले कोरोना संदर्भातील काही नियम शिथिल करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे. इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम होणार आहे.

कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल?

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ‘अ’ श्रेणीत समावेश करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

काय आहे नियमावली?

सर्व सरकारी, खासगी कार्यालयं 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास संमती

शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास संमती

रेल्वे किंवा बसने प्रवास करताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधकारक

चित्रपटगृहं, मॉल्स या ठिकाणी प्रवेश करतानाही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक

मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्कही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची संमती

लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार यावर असलेले विविध निर्बंधही हटवण्यास संमती


14 जिल्हे अनलॉक करण्याचे निकष

1) पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक

2) दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक

3) पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यापेक्षा कमी हवा