चंद्रपूर जिल्ह्यातील दोन काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३१ मार्च २०२२

चंद्रपूर जिल्ह्यातील दोन काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली

चंद्रपूर जिल्ह्यातील दोन काँग्रेस आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली


महाराष्ट्राच्या राजकारणातील अलीकडच्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यासाठी राज्यातील 28 आमदारांनी काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 2 आमदारांचा समावेश आहे. 


आमदार संग्राम अ. थोपटे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना हे पत्र पाठविले आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात आमदारांच्या शिष्टमंडळाने भेटीची विशेष वेळ मागितली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर आणि राजुरा येथील आमदार सुभाष धोटे यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षातील एक गट दिल्ली ला जाणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

MLA Sangram a. Thopte has sent the letter to Congress national president Sonia Gandhi. A delegation of MLAs led by him has asked for a special appointment. These include Pratibha Dhanorkar, MLA from Bhadrawati- warora and Subhash Dhote, MLA from Rajura.