ब्रह्मास्त्र'ची कू वर जोरदार चर्चा, करण जोहरने चा 'हा' व्हिडियो होतो आहे ट्रेंड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० मार्च २०२२

ब्रह्मास्त्र'ची कू वर जोरदार चर्चा, करण जोहरने चा 'हा' व्हिडियो होतो आहे ट्रेंड
30 मार्च, 2022: बॉलिवुडमध्ये आपल्या रोमॅन्टिक सिनेमांच्या माध्यमातून आगळा ठसा उमटवणारा दिग्दर्शक म्हणजे करण जोहर. करणच्या आगामी ब्रम्हास्त्रचा एक सुरेख व्हीडिओ सध्या 'कू'वर ट्रेंड होतो आहे.  करण जोहर सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. वैयक्तिक आयुष्यातल्या गंमतीदार गोष्टींसह आगामी प्रकल्पांबाबतचे अपडेट्सही तो आवर्जून चाहत्यांशी शेअर करत असतो.   आताही त्याने पोस्ट केलेला व्हीडिओ चाहत्यांनी उचलून धरला आहे. करणच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉलिवुडमधला आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असल्याचे बोलले जाते आहे. अयान मुखर्जी यांनी सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.  या सिनेमात ५ हजार वर्षे जुन्या अस्त्राच्या मदतीने रणबीर कपूर जगाला वाचवतो. सिनेमाचं पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झाल्याचा उत्स्फूर्त आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट आलिया भटने विविध सोशल मीडियावर टाकल्या. करणनेही हा सिनेमा येत्या ९ सप्टेंबरला रिलीज होणार असल्याचं जाहीर करत एक लक्षवेधी व्हीडिओ 'कू' ॲपवर शेअर केला आहे. 
तीन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज करण्यात येणाऱ्या या सिनेमात रणबीर कपूर, मौनी रॉय, आलीया भट, अमिताभ बच्चन, नागार्जून आणि शाहरूख खान यांच्याही भूमिका आहेत. सोबतच हा सिनेमा विविध भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. फॉक्स स्टुडिओज आणि धर्मा प्रोडक्शन्स यांची ही संयुक्त निर्मिती असणार आहे. 


Strong discussion on Brahmastra's Ku, by Karan Johar