श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | मनसेतर्फे नागरिकांसाठी निःशुल्क शीतपेय वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मार्च २०२२

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | मनसेतर्फे नागरिकांसाठी निःशुल्क शीतपेय वितरण

मनसेतर्फे नागरिकांसाठी निःशुल्क शीतपेय वितरण 


       *महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सोमवार दिनांक २१मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र तर्फे  प्रताप नगर चौक, रिंग रोड नागपूर येथे सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.*
*याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या प्रताप नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सौ. विद्या जाधव, मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष श्री अजय ढोके यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrations)
*याप्रसंगी उपस्थित व परिसरातील नागरिकांना शीतपेय वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी केले.*
 *याप्रसंगी मनसे वरिष्ठ पदाधिकारी यांचेसह महिला सेना शहर अध्यक्षा सौ संगीता सोनटक्के, वाहतूक सेना जिल्हा संघटक श्री सचिन धोटे, शहर उपाध्यक्ष श्री प्रशांत निकम, वाहतूक सेना शहर संघटक श्री मंगेश शिंदे, महिला विभाग उपाध्यक्षा सौ प्रिया बोरकुटे, विभाग उपाध्यक्ष श्री चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष (संघटन)श्री हर्षद दसरे, विभाग उपाध्यक्ष श्री चेतन बोरकुटे, रोजगार व स्वयंरोजगार विभाग संघटक श्री अक्षय दहिकर, सर्वश्री शाखा अध्यक्ष उत्तम रागीट, शाखा अध्यक्ष साहिल बेहरे, शाखा अध्यक्ष देवेंद्र ठाकरे, शाखा अध्यक्ष श्री शिरीष पटवर्धन, शाखा अध्यक्ष समशेर अंसारी, जेष्ठ नागरिक श्री संजय पळसकर, श्री राजू  पोलाखरे, श्री राजू साहू, श्री प्रवीण गायकवाड यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrations with enthusiasm: