बॉलिवुडमधले तरुणाइच्या दिल की धडकन म्हणजे श्रद्धा कपूर - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, मार्च ०३, २०२२

बॉलिवुडमधले तरुणाइच्या दिल की धडकन म्हणजे श्रद्धा कपूर

 


अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस, कू वर शुभेच्छांचा वर्षाव मुंबई, 3 मार्च, 2022: बॉलिवुडमधले तरुणाइच्या दिल की धडकन असलेले नाव म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाच्या आरस्पानी सौंदर्यासह तिचा अभिनय, फॅशन सेन्स, डान्स आणि फिटनेसचेही चाहते असंख्य आहेत. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त हे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सदिच्छा व कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भारतीय मायक्रो-ब्लॉगिंग अॅप 'कू'वरही त्याची झलक पहायला मिळते आहे. श्रद्धा कपूरने अल्पावधीतच बॉलिवुडमध्ये आपली मुद्रा उमटवली आहे. मोजके पण खास सिनेमे हे तिचे वैशिष्ट्य. 'आशिकी 2', 'हैदर', 'स्त्री', 'छिछोरे' या सिनेमांमधला तिचा अभिनय रसिकांनी उचलून धरला. तिचा फिटनेस तर भल्याभल्या अभिनेत्रींना लाजवेल असे आहे. लोकप्रिय झालेल्या सुरेल गाण्यांमधल्या तिच्या कातील अदा रसिकांना खिळवून ठेवतात. श्रद्धा समाजमाध्यमांवरही कायम सक्रीय असते. तिच्या वैयक्तिक आणि सिनेजीवनाबाबत बोलणाऱ्या पोस्ट्स, फोटो आणि व्हीडिओजना रसिक उचलून धरतात. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिच्याबद्दलच्या भावना, तिच्या अभिनय आणि कलागुणांचे कौतुक 'कू'वर भरभरून करताना दिसत आहेत. या काही निवडक खास प्रतिक्रियांची झलक संजय यांनी लिहिले आहे,
आणखी एका युजरने कू केले आहे,
प्रदीप म्हणतात,
मिशिका बिष्ट लिहितात,
चाहत्यांनी श्रद्धाला शुभेच्छा देत तिला वैयक्तिक जीवनासह करियरमध्येही यश मिळावे अशी कामना केली आहे. -------------------------