इंडियन जर्नलिस्ट फेडरेशन संघटनाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदी राजेश रेवते तर जिल्हाध्यक्ष रवी भोगे यांची निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ मार्च २०२२

इंडियन जर्नलिस्ट फेडरेशन संघटनाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदी राजेश रेवते तर जिल्हाध्यक्ष रवी भोगे यांची निवडशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : इंडियन जर्नलिस्ट (पत्रकार) फेडरेशन संघटनेची बैठक शनिवार 12/03/2022 रोजी नागपूरच्या विंध्यवासिनी लॉन मध्ये आयोजित करण्यात आली.

या बैठकीचे अध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट (पत्रकार) फेडरेशन संघटनाचे अध्यक्ष श्री. बिमल थांब ओरिसा, सरचिटणीस शांताराम हैदराबाद तेलंगणा, मा. श्री . कैलासजी भोपाळ, म. प्र, .श्रीमती प्रमिला राऊत, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, श्री. वसंतराव भगत, सचिव, महाराष्ट्र प्रदेश, प्रमुख उपस्थित होते. सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी आपले विचार मांडून मार्गदर्शन केले. इंडियन जर्नलिस्ट (पत्रकार) फेडरेशन संघटनाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार राजेश रेवते यांची नियुक्ती करण्यात आली, तर इंडियन जर्नलिस्ट (पत्रकार) फेडरेशन संघटनाच्या चद्रपूर जिल्हाध्यक्ष, पदी पत्रकार रवी भोगे व महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकारिणीत अंबादासजी आकोटकर, शत्रुघ्न महातो, गीता महाकाळकर, नरेंद्र नानोटकर यांची निवड करण्यात आली व चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत किशोरीकांत चौधरी, रवी कुदुदुला, संदीप तुरकेल आदींची नियुक्ती करण्यात आली.
इंडियन जर्नलिस्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष श्री. श्री.बिमल थौब ओरिसा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पत्रकारांनी एकजूट राहणे गरजेचे आहे. पत्रकारांनाही सरकारकडून मानधन आणि पेन्शन मिळायला हवी, पत्रकारांसाठी स्वतंत्र कायदाही आवश्यक आहे, कधी कधी पत्रकार जीव धोक्यात घालून पत्रकारिता करतात. कधी कधी त्यांच्यावर हल्लेही होतात. पत्रकार हा एकमेव माणूस आहे जो आपल्या लेखणीतून प्रशासन आणि सरकारला जाग आणतो. पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्व पत्रकारांना संघटीत होऊन फेडरेशन शी जुडने आवश्यक असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रमिलाताई राऊत व वसंतराव भगत यांनी केले.