पुष्करसोबत रितेश देशमुख आणि मंजरीचा थ्रिलर अंदाज, 'कू'वर शेअर केले एक्सक्लुजिव पोस्टर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ मार्च २०२२

पुष्करसोबत रितेश देशमुख आणि मंजरीचा थ्रिलर अंदाज, 'कू'वर शेअर केले एक्सक्लुजिव पोस्टर

पुष्करसोबत रितेश देशमुख आणि मंजरीचा थ्रिलर अंदाज, 'कू'वर शेअर केले एक्सक्लुजिव पोस्टर



मुंबई, 25 मार्च, 2022: मराठीसह बॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे पुष्कर जोग. हटके भूमिकांमुळे पुष्करने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. 'जबरदस्त', 'धूम 2 धमाल', सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह 'जाना पहेचाना', 'इएमआय' अशा हिंदी सिनेमांमधून पुष्कर रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. सध्या पुष्करची एक पोस्ट चर्चेत आहे. त्याचा आगामी सिनेमा अदृश्य 13 मेला रिलीज होतो आहे. या सिनेमाचे एक्सक्लुजिव पोस्टर पुष्करने 'कू' वर रिलीज केले आहे. पोस्ट करताना त्याने लिहिले आहे, 'आणि आता प्रतीक्षा संपली... अदृश्य 13 मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. तुम्ही उत्साहित आहात का?' पुष्कर सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सना चाहते कायमच उचलून धरतात.
Koo App
बॉलिवूड चे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा ’अदृश्य’ १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सादर आहे अदृश्य चित्रपटाचे पहिले पोस्टर! @jogpushkar - Manjari Fadnnis (@manjarifadnnis) 24 Mar 2022
'कू'वर पुष्कर सतत रंजक व्हीडिओज आणि फोटोज टाकत असतो. नुकताच त्याने टाकलेला व्हीडिओ चर्चेत आहे. यात पुष्कर स्कॉटलॅंडमध्ये शूटिंगसाठी गेल्यावर काही निवांत क्षण घालवताना दिसतो आहे. या लहानशा व्हीडिओत तो एका निसर्गरम्य ठिकाणी बसलेला आहे. सभोवती हिरवळ आणि काही झाडे दिसतात. निरभ्र आकाशाच्या बॅकग्राउंडला वाजणाऱ्या संगीतासह काही आशयघन संवाद ऐकू येतात, "लाइफ में जो भी होता है ना, वो किसी वजह से होता है... या तो वो आपको कुछ बनाके जाता है, या फिर कुछ सिखाके..." पुढे व्हीडिओत दूरवर पसरलेल्या शहराचे सुर्यास्ताच्या वेळचे नयनरम्य दृश्यही दिसते.