लाइफ में जो भी होता है, वो किसी वजह से होता है... Pushkar Jog - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ मार्च २०२२

लाइफ में जो भी होता है, वो किसी वजह से होता है... Pushkar Jog


स्कॉटलॅंडमध्ये शूट करताना पुष्करचा फिल्मी अंदाज मुंबई, मार्च, 2022: मराठीत आपला अभिनय आणि हटके भूमिकांमुळे लोकप्रियता मिळवलेले एक नाव म्हणजे अभिनेता पुष्कर जोग. 'जबरदस्त', 'धूम 2 धमाल', सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह 'जाना पहेचाना', 'इएमआय' अशा हिंदी सिनेमांमधून पुष्कर रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. पुष्कर सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सना चाहते कायमच उचलून धरतात.
'कू'वरही पुष्कर सतत रंजक व्हीडिओज आणि फोटोज टाकत असतो. नुकताच त्याने टाकलेला व्हीडिओ चर्चेत आहे. यात पुष्कर स्कॉटलॅंडमध्ये शूटिंगसाठी गेल्यावर काही निवांत क्षण घालवताना दिसतो आहे. या लहानशा व्हीडिओत तो एका निसर्गरम्य ठिकाणी बसलेला आहे. सभोवती हिरवळ आणि काही झाडे दिसतात. निरभ्र आकाशाच्या बॅकग्राउंडला वाजणाऱ्या संगीतासह काही आशयघन संवाद ऐकू येतात, "लाइफ में जो भी होता है ना, वो किसी वजह से होता है... या तो वो आपको कुछ बनाके जाता है, या फिर कुछ सिखाके..." पुढे व्हीडिओत दूरवर पसरलेल्या शहराचे सुर्यास्ताच्या वेळचे नयनरम्य दृश्यही दिसते.
पुष्कर सध्या त्याचा आगामी सिनेमा 'अदृश्य'मुळे चर्चेत आहे. यात रितेश देशमुख, मंजरी फडणीस यांच्यासह पुष्कर मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांचे आहे. अजय कुमार सिंह आणि रेखा सिंह हे निर्माते आहेत. हा थ्रिलर धाटणीचा सिनेमा असून उषा नाडकर्णी आणि अनंत जोगही यात खास भूमिकांमध्ये बघायला मिळतील.