राष्ट्रवादी युवतीचे जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांचे समस्या निवारण केंद्र : नामदार जयंतराव पाटील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ मार्च २०२२

राष्ट्रवादी युवतीचे जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांचे समस्या निवारण केंद्र : नामदार जयंतराव पाटील

जुन्नर /आनंद कांबळे
राष्ट्रवादी युवतीचे जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांचे समस्या निवारण केंद्र बनून आपूलकीच्या नात्याने त्यांच्या तक्रारीचे निराकरण करून पुजाताई रावसाहेब बुट्टे पाटील यांचा समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवतील असा विश्वास नामदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.


महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळाले असून या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून युवतींच्या सर्वागीण विकासाचे विविध उपक्रम राबविले जातील असा विश्वास सौ रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त करून पुजाताईच्या कार्याचा गौरव केला.
रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोसोहळा प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नामदार मा.जयंतराव पाटीलसाहेब,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, खासदार डाॅक्टर अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.सौ रूपालीताई चाकणकर यांच्या शुमहस्ते कल्याण पेठ, जुन्नर येथे हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

Public Relations Office of NCP Youth Problem Solving Center for Common Citizens: Namdar Jayantrao Patil