पडोली येथील सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ मार्च २०२२

पडोली येथील सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रम


सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे आज दिनांक 22 मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. मागील महिन्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील यावेळी पार पडले.

सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर सत्र 2021 -2022 संस्कृतिक विभाग च्या वतीने "आभासी पद्धतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीत स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थींनी ऍड. प्रतीक्षा देऊळकर हिला प्रथम क्रमांक मिळाला. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय ,चंद्रपूर यांच्या द्वारे आयोजित सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा, इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर द्वारा आयोजित निबंध स्पर्धेत सहभागीता प्रमानपत्र देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. साकूरे, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रा.डॉ.जयश्री कापसे, प्रा.आडे सर, प्रा.डॉ.देवेंद्र बोरकुटे, प्रा.डॉ.सुभाष गिरडे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.