जुन्नर बिबट सफारीबाबत अद्याप प्रस्ताव नाही- प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांचे स्पष्टीकरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ मार्च २०२२

जुन्नर बिबट सफारीबाबत अद्याप प्रस्ताव नाही- प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांचे स्पष्टीकरणपुणे दि. २२: जुन्नर बिबट सफारीबाबत कुठलाही परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला नाही असे स्पष्टीकरण पुण्याचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एन. आर. प्रवीण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे, जुन्नर बिबट सफारी संदर्भात अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये चालू आहेत. जुन्नर बिबट सफारीबाबत कुठलाही परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला नाही. जुन्नरच्या बिबट प्रवण क्षेत्राबाबत परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जूनच्या पुरवणी मागण्यांमध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार अतुल बेनके यांना दिले आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

No proposal for Junnar Bibat safari yet - explanation of Regional Chief Conservator of Forests
0000