राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित जागर स्वयंरोजगाराचा कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ मार्च २०२२

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित जागर स्वयंरोजगाराचा कार्यक्रम
चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस संलग्नित रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने आज चंद्रपूर येथे "जागर स्वयंरोजगाराचा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश प्रमुख डॉ. ओमकार हरी माळी हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच डॉक्टर ओमकार माळी यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा.ना. जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. मेहबूब भाई शेख यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शासनाच्या विविध योजना तसेच स्वयंरोजगारा संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रमुख डॉक्टर ओमकार माळी हे स्वतः चंद्रपूर जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते.

आज झालेल्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील व शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या गौण खनिज व त्यावर आधारित उद्योगाबाबत माहिती दिली. व त्यानंतर डॉ. ओमकार हरी माळी यांनी उपस्थित राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विविध प्रकल्प, उद्योग त्यासंबंधीची प्रक्रिया याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. व येणाऱ्या काळात इच्छुक पदाधिकाऱ्यांना विविध व्यवसायाबद्दल प्रशिक्षण देणार असल्या बाबतची ग्वाही देत शासनाच्या विविध योजना व उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली असुन सामूहिकपणे केलेल्या उद्योगाचे फायदे समजावून सांगितले.

सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष श्री. राजीव कक्कड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. हिराचंद बोरकुटे, ओबीसी सेलचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. डि. के. आरिकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष श्री. सुनील काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी श्री. मुनाज शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. सुजित उपरे, शहर जिल्हाध्यक्ष श्री. कोमिल मडावी, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष श्री. निमेश मानकर, पंचायत समिती सदस्य श्री. पंकज ढेगारे, शहर उपाध्यक्ष श्री संजय खेवले, जिल्हा प्रवक्ते श्री. प्रलय म्हशाखेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दुर्गापूर ग्रामपंचायत चे मा. सरपंच अमोल ठाकरे, ऊर्जानगर ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खंडाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष केतन जोरगेवार, सौरभ घोरपडे, सतीश मांडवकर, राहुल देवतळे, शुभम आंबोडकर, राहुल भगत, पवन मेश्राम, अंकित धेंगारे, रोशन फुलझेले, संजय शेजुल, रोशन शेख, हेमंत गुंजेकर, स्वप्नील सातपुते, कपिल उईके, पंकज मेंढे, रोहित वाघ, शिवदत्त पवार, हर्षल भुरे, तीमोती बंडावर, चेतन अनंतवार, अभी ढवळे, आकाश निरटवार, ऋषी जोरगेवार, नितीन घुबडे, सुधीर पोइला, मानव वाघमारे, अंकित लाड, संदीप बिसेंन, मनीष वजारे, कुणाल गायकवाड, पियूष भोगेकर, विशाल राऊत, विजय राऊत, सिहल नगराळे, बिट्टू ढोरके, विकास ठाकरे, नदीम शेख यांनी परिश्रम घेतले.