नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ मार्च २०२२

नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला प्रकरणी तीन जण ताब्यातचंद्रपूर : शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर चंद्रपूर शहरातील आझाद बगीचा चौकात प्राणघातक हल्ला झाल्याप्रकारणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनीही शहर पोलीस ठाण्याला भेट दिली असून, त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.

चार दिवसांपूर्वी नगरसेवक नंदू नागरकर हे आझाद बगीचा येथे फिरायला गेले होते. परत जात असताना त्यांना एका युवकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागरकर यांनी त्या युवकास हटकले असता त्याने आपल्या तीन मित्रांना बोलावून बॅटने जबर मारहाण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकासोबत नगरसेवक नागरकर यांचे यापूर्वीदेखील भांडण झाले होते. महिनाभरापूर्वी हे तरुण क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू नागरकर यांना लागला. नागरकर यांनी या तरुणांना हटकले होते. त्यावरून या तरुणांमध्ये नागरकर यांच्याविषयी रोष निर्माण झाला होता. बदला घेण्याच्या भावनेने हे तीन युवक आझाद बागेच्या परिसरात नागरकर यांच्यावर नियमित पाळत ठेवून होते. 
 #Nagndunagarkar #Chandrapur #Crime