विविध मान्यवरांचा सत्कार करून मनसेने साजरा केला मराठी राजभाषा दिन | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०१ मार्च २०२२

विविध मान्यवरांचा सत्कार करून मनसेने साजरा केला मराठी राजभाषा दिन |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे मराठी राजभाषा दिनी विविध उपक्रमांचे आयोजन मनसेच्या पदाधिकारी यांनी नागपुरात केले.

मध्य नागपूर, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी शहरातील आयोजित विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या.


मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके व दक्षिण - पश्चिम विधानसभेचे विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी वैद्यकीय, कला, पत्रकारिता व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी करून मराठी बाणा जपणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला.
नागपुरातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ विवेका हॉस्पिटलचे संचालक *डॉ. प्रशांत जगताप* तसेच कोरोनाच्या कठीण काळात आपल्या उत्कृष्ट नियोजनाने शासकीय मेडिकल हॉस्पिटलची धुरा सांभाळणारे तत्कालीन मेडिकल अधीक्षक *डॉ. अविनाश गावंडे* यांचा सत्कार करण्यात आला.
कला नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे लेखक - दिग्दर्शक *श्री. पराग घोंगे* व ज्येष्ठ रंगकर्मी *श्री रमेश लखमापूरे* तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिला युवा वार्ताहर *सुरभी शिरपुरकर* यांचा सुध्दा गौरव करण्यात आला. *सर्व मान्यवरांचे मनसेने शाल, श्रीफळ व सन्मानपत्र भेट देऊन सत्कार केला व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.*
प्रभाग क्रमांक ४२ येथील सोनेगाव परिसरात मनसेच्या शाखेने नागरिकांसाठी *शासकीय योजनांची माहिती देणारे व विविध गरजेचे आवश्यक असणारे कागदपत्रे बनवून देणारे शिबिर* आयोजित केले याचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.
सायंकाळी सहकार नगर परिसरात मराठी दिनानिमित्त *मनसे शाखा उद्घाटन व स्नेहमिलन कार्यक्रम* आयोजित करण्यात आला.
मध्य नागपूर तर्फे *मराठी गीतांचा कार्यक्रम* घेण्यात आला व *श्रीमंत राजे मुधोजी भोसले* यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तिरंगा चौक, गांधी गेट महाल परिसरात *मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी* अभियान राबविण्यात आले याला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
दक्षिण नागपुरातील काही उद्योजकांनी आपल्या *प्रतिष्ठानचे फलक मराठी भाषेत* करून मराठी भाषेचा मान राखला त्याबद्दल मनसेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष विशाल बडगे, उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले होते.


दीनदयाल नगर येथे मनसे वाहतूक सेनेतर्फे सायंकाळी साजऱ्या करण्यात आलेल्या मराठी राजभाषा दिनी लहान मुलांवर चांगले मराठी संस्कार घडावे यासाठी कार्यरत प्रसिद्ध समाजसेविका *सौ. सुवर्णा बेडगे, विधीतज्ञ श्री रजनीश व्यास* यांच्यासह जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच मनसे वाहतूक सेना *जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन* करण्यात आले याचे आयोजन जिल्हा संघटक सचिन धोटे व सहकारी यांनी केले होते.
*प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी नागपुरातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविले व मराठी राजभाषा दिनी चांगले उपक्रम राबविले असे सांगत सर्व स्थानिक मनसे पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.


MNS celebrated Marathi Official Language Day by felicitating various dignitaries