माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन व जनजागृती करण्याकरिता मोटार सायकल रॅलीचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०४ मार्च २०२२

माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन व जनजागृती करण्याकरिता मोटार सायकल रॅलीचे आयोजन


शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : वनपरिक्षेत्र विभाग वरोराच्या वतीने दि.७ मार्च२०२२ रोजी सकाळी८:००वा माळढोक पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता व जनजागृती निमित्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेआहे. सदर मोटर सायकल रॅली वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथून सकाळी ८:००वा निघणार आहे. आणि रॅलीची सांगता धनोजे कुणबी मंगल कार्यालय वरोरा येथे करण्यात येत आहे. असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, माळढोक पक्षी भारतामध्ये फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यात आढळतो महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच (अहमदनगर )नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो सोलापूर जवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्षासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील काही भागात माळढोक पक्षाचा वावर असल्याचे आढळते.