हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ मार्च २०२२

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती |
मित्रांनो आज आम्हाला फार आनंद होत आहे.याचे कारणही तसेच... रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हे कार्य करण्यात आम्हा सर्व मित्राला यश आले ...प्रत्येकालाच वाटते की , स्वतःसाठी जगावं मात्र कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघावं त्यातून मिळणारा आनंद हा निरंतर टिकणारा असतो...
अगदीच काही दिवसांपूर्वी आम्ही मित्र परिवार वांढरी येथील बाल आश्रमात आम्ही भेट दिली.तेथील एकंदरीत परिस्थिती पाहताना आम्हाला कमालीचे दुःख झाले.आणि म्हणूनच सर्व मित्र एकत्र येत, तेथील बाल आश्रमाला रंगरंगोटी करण्याचे ठरविले.
बघता बघता आज रंगरंगोटी  पूर्णत्वास आली. हे आश्रम सुंदर होतेच.मात्र आम्ही थोडासा त्यात रंग भरला आणि आता ते अधिक सुंदर दिसेल... त्याच बरोबर आश्रमातील आया  यांचा सत्कार  करण्यात आला....

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :- सुमित पुल्लावार
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन :- खुशाल काळे

 *या सत्कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व जिवलग मित्रांचे मनपुर्वक धन्यवाद....🌹*