२८ मार्च २०२२
सन्मान पद्मगंधाचा,गौरव महाराष्ट्राचा नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये
पद्मगंधा प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव साहित्यिक ,सांस्कृतिक संस्था आहे.ज्या संस्थेला अखंड बावीस वर्षे सातत्याने ' पद्मगंधा दोन अंकी लेखिका नाट्य महोत्सव चालवण्याचं श्रेय मिळालं असून आजवर या संस्थेने दोन अंकी एकूण ६६ नाट्यकृती लेखिकांकडून लिहून त्या सादर केल्या आहेत .
या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेत पद्मगंधा प्रतिष्ठानला ३ एप्रिल रोजी होणाऱ्या सन्मान
समारोहात सन्मान प्रदान करण्यात येईल.
LONGEST RUNNING THEATRICAL FESTIVAL OF UNIQUE TWO - ACT PLAYS BY WOMEN WRITERS इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये झाली आहे.
हा सन्मान प्रदान करणार आहेत डॉ.मनोज तत्वादी ,राष्ट्रीय परीक्षक ,इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस,गिरीश गांधी फाऊंडेशनचे डॉ.गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोह होणार असून सुप्रसिद्ध शेफ मा.विष्णू मनोहर ह्या समारोहाचे उ्द घाटक आहेत.तर राष्ट्र भाषा संस्थेचे अध्यक्ष मा.अजय पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.बाबुराव धनवटे सभागृह ,शंकरनगर मध्ये सायंकाळी ठीक साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
सचिव संगीता वाईकर.
********************
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
